। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काही महिन्यांपूर्वी भाजप मध्ये प्रवेश केला होता. आता त्याच मनसेमधून भाजपवासी झालेल्या कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याने भाजपाचे कार्यकर्ते यांनी घरवापसी करीत मनसेमध्ये पुनर्प्रवेश केला आहे. दरम्यान, संतोष कदम यांनी आपला भाजपमध्ये भ्रमनिरास होत असल्याने पुन्हा मनसेमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार माथेरान शहरातील संतोष कदम यांच्यासह संतोष केळगणे, पप्पू भाई खान, शैलेश सोबत, आसिफ खान, रवी कदम, किसन चौधरी, अंजली केळगणे, सीमा कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसे मध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष सचिन कर्णूक, तालुका अध्यक्ष यशवंत भवारे, जिल्हा सचिव अक्षय महाले, जिल्हा वाहतूक सेना अध्यक्ष जयवंत कराळे आदी उपस्थित होते.