| पनवेल | वार्ताहर |
पळस्पे फाटा येथील जनता चिकन मटण शॉप दुकानासमोर उभी करून ठेवलेली होंडा अॅक्टीव्हा गाडीची चोरी झाल्याची घटना घडली आहे. जुनेद रफिक तांडे (35) यांनी त्यांची 25 हजार रुपये किंमतीची होंडा अॅक्टीव्हा गाडी (एमएच-46-सीएफ-1954) एका ठिकाणी ठेवली होती. गाडीजवळ कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्याने ती दुचाकी चोरुन नेली आहे.याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.