संतोष सोनी यांचा प्रामाणिकपणा

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।

रोहा तालुक्यातील वाकण नाक्यावर असलेल्या संतोष सोनी यांच्या सोनी पान शॉपमध्ये विसरून गेलेला महागड्या किमतीचा मोबाईल व रोख रक्कम परत केली.

बुधवार दि.20 रोजी दुपारी सोनी पान शॉपमध्ये काही वस्तू खरेदी करून घाई गडबडीने निघालेल्या उमेश हंबीर हा 25,000 रुपये किंमतीचा महागडा मोबाईल व मोबाईलच्या कव्हरमध्ये असणारे रोख रक्कम 500 रुपये सोनी पान शॉपमध्ये विसरून गेला होता. घरी गेल्या नंतर आपला मोबाईल हरवला असल्याचे त्याला कळले व त्या मोबाईल वरून फोन केल्यावर तो मोबाईल सोनी पान शॉप येथे आहे असे सोनी यांनी सांगितले. तो मोबाईल व रोख रक्कम 500 रुपये हंबीर याला सोनी यांच्या प्रामाणिकपणामुळे परत केले.

Exit mobile version