सुमन पांडव यांचा प्रामाणिकपणा

। पाली । वार्ताहर ।

एसटी स्टँड येथे मच्छी विक्री करणार्‍या सुमन राजेंद्र पांडव यांना एक पर्स त्यामध्ये मोबाईल व रोख रक्कम 1840/- असा ऐवज सापडला. तो त्या व्यक्तीला परत करत या मच्छी विक्रीतिने समाजात अजूनही प्रामाणिकपणा कायम आहे हे आपल्या कृतीतून दाखवून देत इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.

पाली एसटी स्टँड समोर मच्छी विक्रेत्या सुमन पांडव यांना बुधवारी (दि.20) एका महिलेची पर्स सापडली. ती पर्स घेऊन त्यांनी पाली पोलीस स्टेशन गाठले आणि पर्स पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी पर्स तपासली असता पर्समध्ये मोबाईल आणि रोख रक्कम 1 हजार 840 रुपये होते. पर्समधील मोबाईलवरून ही पर्स राबगाव येथील स्मिता नामदेव भोईर यांची असल्याचे समजले. त्यांना फोन करून पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले आणि सदर पर्स व त्याच्यातील ऐवज त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

Exit mobile version