रेल्वे कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

प्रवाशाला मिळाला मोबाईल

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला रेल्वे मार्गावर मोबाईल सापडला होता. बंद अवस्थेत असलेला मोबाईलमधील सिम कार्ड त्याने आपल्या मोबाईलमध्ये टाकले आणि त्यावर संबंधित मोबाईलधारक व्यक्तीला संपर्क करुन त्याचा मोबाईल परत केला.

विरार येथील प्रवासी गणेश चंद्रकांत जाधव हे 16 सप्टेंबर रोजी दादर येथून कोयना एक्स्प्रेसने एस पाच या डब्यातून सातारा जात होते. कर्जत रेल्वे स्थानकातून ही गाडी सुटली असता गणेश जाधव यांच्या यांच्या पत्नीचा फोन आला. यावेळी गणेश यांच्यासोबत प्रवास करणारा त्यांचा मुलगा आईशी बोलत असताना त्याच्या हातातून फोन खाली गाडीच्या बाहेर पडला. हा फोन कर्मचारी बाबू नामदेव पिरकड यांच्या हाती लागला. त्यांनी आपल्याजवळील मोबाईल फोन कर्जत रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस कार्यालयात जमा केला.

संबंधित रेडमी कंपनीचा मोबाईल फोन हा गणेश जाधव यांचा आहे अशी कागदपत्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्याकडे सुपूर्द केली. त्यावेळी पोलीस अधिकारी यादव यांनी रेल्वे कामगार बाबू पिरकड यांना बोलावून घेतले आणि त्या कामगाराने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करून संबंधित मोबाईल फोन पालघर जिल्ह्यातील विरार येथील प्रवासी गणेश जाधव यांच्या ताब्यात दिला.

Exit mobile version