रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा

| खांब-रोहा | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील नडवली गावचे रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करणारे सुनील वरखले यांनी त्यांना सापडलेला महागड्या किंमतीचा मोबाईल मुळ मालकास परत करून आपल्यातील प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुनील वरखले खांब-देवकान्हे मार्गावर आपल्या रिक्षातून जात असताना खांब गावाच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला महागड्या किंमतीचा मोबाईल पडलेला दिसला. सदरील मोबाईल त्यांनी आपल्याजवळच ठेऊन घेतला. थोड्यावेळाने त्यांना त्याच मोबाईलवर एक कॉल आला व मोबाईलचा मुळ मालक असलेल्या धानकान्हे गावातील रोहिदास पवार याने आपलाच मोबाईल पडला असल्याचे व आपली ओळख पटवून दिल्याने त्यांनी मुळ मालकास महागडा मोबाईल परत करून आपल्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडवून दिले.

Exit mobile version