। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील कोर्लई गावातील सबस्टिन एम. वेगस (67) या गृहस्थाचे पॉकीट राजवाडा रस्तावर पडलेल्या अवस्थेत दोन विद्यार्थ्यांना सापडले होते. या विद्यार्थ्यांनी ते पॉकीट ताबडतोब पोलीस ठाण्यात जाऊन जमा केले. विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिकपणाचे पोलिसांकडून कौतुक करण्यात आले.
मुरुड तालुक्यातील कोर्लई गावातील सबास्टिन एम. वेगस हे आपल्या मोटार सायकलवरून मुरुडमध्ये गेले होते. पुन्हा घरी परतताना खिशातून पॉकीट कुठेतरी पडून गहाळ झाला होते. त्याच मार्गावरून अंजुमन डिग्री सायन्स कॉलेजचे विद्यार्थी दोन विद्यार्थी सफान शकील खामकर व अरमान सलीम दखनी यांना राजवाडा येथील वळणावरील रस्तावर हे पैशाचे पाकीट सापडले. ते पॉकीट उचलून मुरुड पोलीस ठाण्यात जाऊन ठाणे अंमलदार यांना सुपुर्त केले. ठाणे अंमलदारांनी सबास्टिन वेगस यांना कळविल्यावर ताबडतोब ते स्वतः पोलीस ठाण्यात येऊन आपल्या ताब्यात घेतले. या मुलांचे सबास्टिन वेगस यांनी आभार मानले. तसेच, पोलीस ठाण्यामार्फत या दोघा विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक उदय झावरे उपस्थित होते.