। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
लांजा एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान रोख रक्कम आणि वर सोन्याची वस्तू असलेली प्रवाशाची राहिलेली पर्स परत करून लांजा आगारातील चालक आणि वाहकाने आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. कोट ते लांजा असा प्रवास करताना रेश्मा गावडे या महिलेची पर्स बसमध्ये राहिली होती. या वेळी त्या बसमध्ये चालक महेश शेणवी आणि वाहक संतोष चव्हाण ड्युटीवर होते. त्यांना एक पर्स बसमध्ये राहिलेली दिसली. ती त्यांनी तपासून पाहिल्यानंतर त्या पर्समध्ये 3700 एवढी रोख रक्कम व दोन सोन्याच्या रिंगा असा ऐवज होता. ही पर्स चालक आणि वाहक यांनी लांजा बसस्थानकाच्या कंट्रोल रूममध्ये आणून दिली. त्यानंतर संबंधित महिला रेश्मा गावडे चौकशीकरिता आल्यानंतर त्यांना ती पर्स ओळख पटवून परत देण्यात आली.