खेड तालुक्यातील आशा वर्कर्सचा सन्मान


खेड । प्रतिनिधी ।
14 जून 2021 रोजी खेड नगर परिषद हॅालमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून कोरोना संक्रमणाच्या अत्यंत कठिण काळात स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता दक्ष राहून प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार्‍या खेड तालुक्यातील आशा वर्कर्स यांचा साडी व सन्मानपत्र देऊन त्यांचा कोव्हिडयोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.

या वेळी शहराध्यक्ष भूषण चिखले, संजय आखाडे, पुष्पेंन दिवटे, नंदु साळवी, आधार पाटणे,केतन आंब्रे,विनय माळी,सिद्धेश साळवी,सुरेश खेडेकर, रहिम सहिबोले,दादु नांदगांवकर, शैलेश गायकवाड,राजश्री पाटणे,मानसी चव्हाण, गौरी पुळेकर,मिनल गांधी, सौ. माळी,मनाली पावसकर, श्रध्दा कवळे,आर्या कारेकर,सिद्धेश पाटणे,बावा खेडेकर, अंकुश मिर्लेकर,जयेश गुहागरकर,प्रदिप भोसले,प्रतिक पुळेकर,अंकुश शिंदे,व इतर मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version