खालापूर पोलिसांचा सन्मान

। रसायनी। वार्ताहर ।
खालापूर पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीम ने सतत उल्लेखनीय कामगिरी कामगिरी बजावली असल्याने त्यांचा सन्मान रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नुकताच अलिबाग येथे मुख्यालयात केल्याने खालापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस यांचे कौतुक होत आहे.
खालापूरचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते यांनी खालापूर पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांवर चांगलाच अंकुश ठेवण्यात त्यांना आणि त्यांच्या टीमला यश आले आहे. खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हेगारी नोंद होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते,सपोनि संजय बांगर,सपोनि शेखर लव्हे,पोसई.बजरंग राजपूत,मपोसई. सरला काळे,पोह. नितीन शेगडे, पोअं. हेमंत कोकाटे,पोना.सचिन व्हसकोटी यांचा सन्मान जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आला.

Exit mobile version