खोपोली | वार्ताहर |
सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना नुकताच पद्मश्री पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे. माईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी युवक काँग्रेस खोपोली शहर अध्यक्ष अतुल पाटील आणि पदाधिकार्यांंनी मांजरी पुणे येथील वसतीगृहाला भेट देत सन्मान केला. युवक अध्यक्ष अतुल पाटील, कार्याध्यक्ष इंद्रसेन घोडके,सल्लागार भास्कर लांडगे,उपाध्यक्ष सोहन साखरे,रमाकांत रावळ आदी यावेळी उपस्थित होते.