क्लीनअप चेंढरे अभियानअंतर्गत सत्कार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद अलिबाग व ग्रामपंचायत चेंढरे तालुका अलिबाग यांच्या मार्फत क्लीन अप चेंढरे अभियान अंतर्गत सोसायटी मध्ये शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणार्‍या अध्यक्ष व सचिवांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील व प्रियदर्शनी पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री जयवंत गायकवाड, तसेच सरपंच स्वाती पाटील, माजी उप सरपंच यतीन घरत, उपसरपंच प्रणिता म्हात्रे व ग्रामपंचायत सदस्य रोहन पाटील, ममता मानकर, अस्मिता म्हात्रे, अनिता शेंडे, स्मिता ढवळे, सकपाले, नेमाडे आदी उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणार्‍या व्यक्तीचा गौरव केला.व स्वच्छतेत सातत्य राखणे साठी विविध उपक्रम बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ईकोसत्व संस्थेचे प्रमुख विजय सकपाळ. संवाद तज्ञ सुरेश पाटील, रांजणकर, ग्रामसेवक नीलेश गावंड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी टाकावूतून टिकाऊ वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच पाटील व श्री गायकवाड यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचलन विजय सकपाळ तर प्रास्ताविक यतीन घरत यांनी केले.

Exit mobile version