। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील रा.जि.प. प्राथमिक वरवठणे शाळेच्या उपक्रमशील आणि क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य असणार्या शिक्षिका पनिता गावित यांना सन आदर्श क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अंजुमन स्कूल म्हसळा येथे 31 डिसेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, वरिष्ठ विस्ताराधिकारी अ. बा. मोरे, कनिष्ठ विस्ताराधिकारी बशीर ऊल्डे, केंद्र प्रमुख नरेश सावंत, किशोर मोहिते, गट समन्वयक अण्णासाहेब बिचुकले, भानुदास राठोड, महादेव पवार, महेश विचारे, राहुल नाईक, तालुका क्रीडा अध्यक्ष डावखर, क्रीडा समन्वयक हालसंगी, तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व सर्व क्रीडाशिक्षक वृंद आदी मान्यवर उपस्थित होते.






