। अलिबाग । वार्ताहर ।
आक्षी येथील गोविंद बाळू पाटील यांच्या जन्मदिवसाचे अवचित्य साधून आजूबाजूच्या गावातले शेतकरी व पशुसंवर्धन विभागातील त्यांच्या सहकारी व त्याच्या कुटूंबातील लोकांनी त्याचा प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करणेत आले. गोविंद पाटील हे 1955 साली परिचर म्हणून पशु वैद्यकीय दवाखाना म्हसळा येथे कामाला लागले. नंतर पेण, चौल अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केले. त्यांनी 30 वर्षे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने जनावरांवर प्रथमोपचार करुन अनेक जनावराचे प्राण वाचवले त्यांच्या या सेवेबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मालती पाटील सेवानिवृत्त शिक्षक व प्रमुख पाहुणे उल्हास भाटे चेअरमन, पशु चिकित्सा व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर. डॉ. रविंद्र पाटील, डॉ. राजू म्हात्रे त्याच्या काळातील सहकारी पशुवैद्यकीय जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.