कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

| उरण | वार्ताहर |
काँग्रेस नेते अ‍ॅड. उमेश मधुकर ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम सातिर्जे येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी उमेश ठाकूर,प्रवीण ठाकूर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.कार्यक्रमास काँग्रेस सेवा फॉउंडेशनचे पदाधिकारी, अलिबाग मुरुड काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना, ओबीसी व अल्पसंख्याक कमीटी आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्यामध्ये उरणमधील केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था, सोनाली बुंदे (शैक्षणिक) संगीता ढेरे (सामाजिक ), अजय शिवकर (साहित्य), सुभाष कडू (पत्रकार), राकेश पाटील(सामाजिक ),डॉ झेलम चंद्रकांत झेंडे (शैक्षणिक )आदी मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे.

Exit mobile version