| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथील उद्योजक तथा तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक खेमचंद (विजयशेठ) चुनीलाल मेथा यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल, तर पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष मजिद इस्माईल हाजिते यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्व. माजी आ. मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप मित्रमंडळ रायगड, अॅड. उमेश ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने विधान परिषदेचे आ. भाई जगताप, आ. हेमंत ओगले, माजी आ. रवींद्र धंगेकर, अॅड. उमेश ठाकूर आदी मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी (दि.3) सायंकाळी मु. सातिर्जे, ता. अलिबाग या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंती निमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय, सांस्कृतिक तसेच पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांचा दरवर्षी माजी आ. मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप मित्रमंडळ रायगड, अॅड. उमेश ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. या कार्यक्रमात अॅड. उमेश ठाकूर यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जल्लोषात साजरा करण्यात आला. यंदा या पुरस्कार सोहळ्याचे हे पंधरावे वर्षे होते. माणगाव येथील उद्योजक विजय मेथा यांचा सामाजिक कार्यातील योगदान विचारात घेऊन, तर पत्रकार मजिद हाजिते यांचा पत्रकारिता क्षेत्रातील योगदान विचारात घेऊन त्यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रदेश काँग्रेस सचिव अॅड. प्रवीण ठाकूर, राजाभाऊ ठाकूर, ठाकूर कुटुंबीय, महिला पायलट प्राप्ती ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते आरिफ बामणे, सुनील थळे, तोडणकर गुरुजी आदी मान्यवरांसह पुरस्कार्थी, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विजयशेठ मेथा व मजिद हाजिते यांना कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.