| चणेरा | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे मराठी शाळेची शैक्षणिक सहल इयत्ता पाचवी ते सातवीच्या 41 विद्यार्थ्यांची सहल मुंबई दर्शन येथे गेलेली होती. याबाबत पालकांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले. सकाळी साडेपाचला निघाल्यावर सि लिंकद्वारे मुलांनी आनंद लुटला. प्रथम गेटवे ऑफ इंडिया, मुंबईचे प्रवेशद्वार, ताज हॉटेल आदी बाबींची विद्यार्थ्यांना माहिती दिली. यानंतर गेटवे ऑफ इंडियाजवळीलच वस्तुसंग्रहालयात विद्यार्थ्यांना नेण्यात आले.
वस्तुसंग्रहालयात विविध प्राणी, पक्षी यांचे चित्रे शिल्पे, ढाल, भाले, तलवार इत्यादी बाबींची मुलांनी प्रत्यक्ष पाहून माहिती घेतली. नेहरू तारांगणात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पृथ्वी कशी तयार झाली, आकाशातील नक्षत्र, तारे, तारका समूह इत्यादी बाबीची पडद्यावर शोद्वारे माहिती झाली. सुमारे एक तास झालेल्या या चित्रपटात विद्यार्थ्यांना विज्ञानाची बरीचशी ओळख निर्माण झाली. सुरुवातीला सूर्यमाला व इतर बाबींची माहिती विद्यार्थ्यांना एकत्र बसून देण्यात आली. यावेळी आपल्या मुरुड तालुक्यातील आदर्श शाळा मजगाव येथील विद्यार्थी व शिक्षकवृंद सोबत होते.
मत्स्यालय पाहायला गेल्यानंतर तेथे काम चालू असल्याने आत प्रवेश मिळाला नाही. परंतु, यानंतर विद्यार्थ्यांना भायखळा येथील राणीच्या बागेत देण्यात आले. राणीच्या बागेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अस्वल, वाघ, रानगेडा, पाणघोडा, हिरवे राखाडी पोपट, पेंग्विन, मोर इत्यादी प्राणी पक्षी प्रत्यक्ष पाहिले. शाळेच्या अध्यक्षा सुकन्या दुकले यांनी दिलेले भेळीच्या साहित्याने विद्यार्थ्यांसाठी भेळ बनवून देण्यात आली. मध्येच मॉलला थांबवून विद्यार्थ्यांना खरेदीचा आनंद लुटू दिला. अशाप्रकारे शाळा चोरढे मराठीची शैक्षणिक सहल अतिशय आनंदी व प्रसन्न वातावरणात पार पडली. सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय व्यवस्थित शिस्त व आनंदाचे दर्शन घडवले. सहलीसाठी लगेच परवानगी देणारे तालुका गटशिक्षणाधिकारी श्री. गवळी व सहल यशस्वी करण्यासाठी मदत करणारे सर्व शिक्षक वृंद, सर्व पालक, सर्व विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती व सर्वांचे पालकांनी आभार मानले.