सेवानिवृत्त शिक्षिकेचा सन्मान

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील खांब हायस्कूलच्या 1982/83 च्या बॅचच्या मैत्रीणी जवळ-जवळ 42 वर्षांनी गेटटुगेदरच्या निमित्ताने एकत्र आल्या. या मैत्रिणींनी सुनीता कदम शिक्षक सेवेतून मुख्याध्यापिक या पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या शालेय जीवनातील मैत्रींकडून शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमात स्नेहा सूर्यकांत विरकर (केंद्रप्रमुख-महाड) यांनी गीत गायन करून मनोरंजन केले. यावेळी स्नेहा विरकर, सुनीता कदम, रंजना गोविलकर, सुमन लोखंडे, निर्मला भगत, संगीता वेदक, बेबी जाधव(करकरे), संध्या शेठ(गांधी), साधना नागावकर, पुष्पा कापसे(सानप), लता भोईर आदी उपस्थित होत्या.

Exit mobile version