ज्योती म्हात्रे यांचा सन्मान

। अलिबाग । वार्ताहर ।

रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन उरण येथे नुकतेच पार पडले. यामध्ये प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालय अलिबागच्या ग्रंथपाल ज्योती प्रकाश म्हात्रे यांना जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्ष शैला पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ज्योती म्हात्रे या गेली 28 वर्ष प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालय अलिबाग येथे कार्यरत आहेत. रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जेष्ठ नेते स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या प्रेरणेने या ग्रंथालयाची स्थापना झाली असून गेली 25 वर्षे हे ग्रंथालय ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.

यावेळी रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे तसेच, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षा शैला पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, रामदास गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योती म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Exit mobile version