कांचन बिडवे यांचा सत्कार

| रायगड | प्रतिनिधी |

जागतिक महिला दिनानिमित्त जागर स्त्री शक्तीचा हा कार्यक्रम महाड येथे आयोजित करण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल रायगड 108 रुग्णवाहिका उपजिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे-आहेर यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

कांचन बिडवे या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम केले. त्यानंतर भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) आणि महाराष्ट सरकार संचलित 108 रुग्णवाहिका रायगड उपजिल्हा व्यवस्थापक म्हणून काम पहात आहेत. याआधी त्यांनी विविध जिल्ह्यात सेवा केली आहे. बिडवे यांना बेस्ट एम्प्लॉईज, कन्यारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Exit mobile version