लाडवली बेटकर कोंडचा सन्मान

| महाड । प्रतिनिधी ।

महाड तालुक्यातील लाडवली बेटकर कोड येथील ग्रामस्थांनी एकत्र येत स्वदेशच्या उपक्रममध्ये सहभाग घेत स्वप्नातील गाव घडविला. लाडवली येथील बेटकर कोंड या वाडीने शोष खडडे, कचरा कुंडी, सुका व ओला कचरा वेगळा करुण त्याचे वर्गिकरण करणे, दर अठवडयाला संपुर्ण गांव स्वच्छ करणे, वृक्ष रोपण करणे, मुला मुलींचे मेळावे घेणे असे समाज उपयोगी राबविले होते. त्याची दखल घेत जिल्हा परिषद तर्फे सन्मान पत्र देण्यात आले. तसेच स्वदेस फाउंडेशनचा वतीने सन्मान देण्यात आले.

या कार्यक्रमास सरपंच कुष्णा शिंदे, स्वदेसचे उपसंचालक नीता हरमरकर, बलासे माने, संकेत तांडले, शीतल सूर्यवंशी, मिलिंद आढाव, निसार ढोकले, पोलीस पाटील इलियास ढोकले,पाचाड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शेलके, तंटामुकत अध्यक्ष शेखर बेटकर, ग्रामसेवक, गांवातील कृषी कन्या व ग्रामस्थ मंडल उपस्थित होते.

Exit mobile version