| रेवदंडा । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील मल्याण येथील विशेष कलाकार महेंद्र गांवड यांना पुणे येथील आर्ट बिटस् फांउडेशन महाराष्ट्रकडून राज्यस्तरीय कला सन्मान 2022 पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. आर्ट बिटस् फांउडेशन, पुणे यांचे वतीने कला क्षेत्रात एक कलाकार म्हणून करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार 2022 ने महेंद्र गांवड यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथील आर्ट बिटस् फांउडेशनचे संस्थापक-अध्यक्ष संतोष पांचाळ यांनी महेंद्र गांवड यांचे हस्ते कला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले.