| अलिबाग । वार्ताहर ।
जिल्हा परिषद पेझारी शाळेत डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या संकल्पनेतून सर्व क्षेत्रांमध्ये जे विद्यार्थी प्राविण्य दाखवतील अशा चार विद्यार्थ्यांची गेल्या वर्षभरातील कामगिरीचे गुणदान करून निवड करण्यात आली. त्यात सिया म्हात्रे इयत्ता आठवी, साईराज म्हात्रे इयत्ता सातवी, सचिन म्हात्रे इयत्ता पाचवी, मुग्धा पाटील इयत्ता तिसरी. या चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2500 रुपये प्रशस्तीपत्र देऊन डॉ. चांदोरकर, सुरेश म्हात्रे, निमेश परब, आरती थळे, दिलीप कुमार भड, कुमार जोगळेकर श्री पांचाळ, श्री केळुस्कर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
डॉ. चांदोरकर यांनी येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणार्या सर्व विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी सर्व प्रकारचे ब्लड टेस्ट व चाचण्या पहिल्या आठ दिवसात करण्याचे निश्चित करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यामागे येणारा खर्च डॉ. चांदोरकर व पेझारी गावातील विकास जाधव याने संयुक्तरित्या उचलण्याचे मान्य केले. तसेच पुढील शैक्षणिक वर्षात दोन विद्यार्थी निवडले जातील त्यांचे बक्षीसाचा घनादेश त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक नितिष पाटील यांच्याकडे सुपूर्त केला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार निलिमा पाटील यांनी केले.