सचिन मोदी यांचा सन्मान

। नागोठणे । वार्ताहर ।

रोटरी क्लबचा डिस्ट्रिक्ट मेंबरशिप अवॉर्ड कार्यक्रम नुकताच पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात राजू सुब्रमण्यम व डी.जी. डॉ.अनिल परमार, मंजू फडके, यांच्या हस्ते मेंबरशिप कमिटीचे मेंबर विक्रम जैन, रोहा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट सुरेंद्र निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लबतर्फे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवल्यामुळे सचिन मोदी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला रोहा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट संजय नारकर, नागोठणे रोटरी क्लबचे गौतम जैन, मांगीलाल चौधरी उपस्थित होते.

Exit mobile version