ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान

अलिबाग फोटोग्राफर असो.चा उपक्रम

। अलिबाग । प्रतिनिधी ।

छायाचित्रकार म्हणून गेली अनेक वर्षे योगदान देणार्‍या अलिबागमधील तीन ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. जागतिक छायाचित्रदिनानिमित्त अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनही हा उपक्रम सोमवारी (दि.19) राबविला. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन ही संस्था ज्येष्ठ छायाचित्रकारांचे योगदान लक्षात घेऊन दरवर्षी त्यांचा सन्मान करीत असते. गेले सहा वर्ष हा उपक्रम असोसिएशन राबवत आहे. यावर्षी जागतिक छायाचित्रदिनानिमित्त सदानंद पाटील (वाघ्रण), सुरेश खडपे (चौल), रवींद्र घरत (चौल) या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येेष्ठ फोटोग्राफरने आपले अनुभव सांगितले. तसेच, असोसिएशनचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी रायगड फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, अतुल वर्तक, विजय पाटील, अमर मढवी, योगेश सावंत, मच्छिंद्र दवंडे, गणेश जाधव, निलेश दुदम, रविराज पाटील, विराज घरत हे उपस्थित होते.

Exit mobile version