| कोर्लई | वार्ताहर |
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आरसीएफ ज्युनिअर कॉलेज कुरुळ येथील विद्यार्थी अवधूत संदीप वारगे यांचा प्रजासत्ताकदिनी सत्कार करण्यात आला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेहिकल मिशन 2023 मध्ये 150 उपग्रह निर्मिती व प्रक्षेपण राज्य तामिळनाडू व 50वे राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन 2023 बालेवाडी पुणे येथे सहभाग घेतला होता. यावेळी आर.सी.एफ. सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल कुरुळची विद्यार्थिनी परी संदेश काटकर, चिंतामणराव केळकर विद्यालयाची विद्यार्थिनी स्वरा अविनाश पाटील, को.ए.सो. जानकीबाई रघुनाथ हळदवणेकर हायस्कूलची विद्यार्थिनी मोनिका संदीप बाबर यांचाही सत्कार करण्यात आला.