पनवेलच्या स्वच्छता दूतांचा सन्मान

प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते केला सत्कार
। पनवेल । वार्ताहर ।
दिल्ली येथे झालेल्या स्वच्छ अमृत महोत्सव 2021 या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेला बेस्ट सिटीझन लेड इनिशिएटीव ओवरॉल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे खरे मानकरी पनवेल मधील सर्व स्वच्छता दूत यांचा संविधान दिनानिमित्त विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला. या पुरस्काराचे खरे मानकरी आपल्या पनवेलमधील सर्व स्वच्छता दूत आहेत त्यांचाच या पुरस्कारामध्ये सिंहाचा वाटा आहे असे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यानी सांगितले. त्यामुळे सर्व सहकारी नगरसेवकांसोबत स्वच्छता दूतांचा सन्मान करून त्याना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, रविंद्र भगत, ज्ञानेश्‍वर पाटील, नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, प्रीती जॉर्ज, प्रिया भोईर, पालिका अधिकारी, स्वच्छता दूत, कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version