। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिव्यांग बांधवांना शेकाप महिला आघाडी प्रमुख, अलिबाग नगरपरिषद नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते झेरॉक्स मशीन देऊन गौरविण्यात आले
चौल येथील प्रणव गजानन भगत आणि महानवाडी येथील ऋषिकेश धनावडे यांना आद्ययावत झेरॉक्स मशीन देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी शेकापचे महेंद्र विंद्रे, काविर ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र म्हात्रे, गिरीश तेलगे, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे, तृप्ती भगत, सतीश भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
दिव्यांगांचा झेरॉक्स मशीन देऊन सन्मान ; शेकापच्या चित्रलेखा पाटील यांची उपस्थिती
