स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान

| माथेरान | वार्ताहर |

भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महत्वपूर्ण योगदान देणार्‍या वीर हुतात्मा भाई कोतवाल, वीर हुतात्मा हिराजी पाटील व भाई कोतवाल दस्त्यातील सर्व क्रांती वीरांच्या स्मरणार्थ 1942 च्या स्वातंत्र्य समरातील माथेरानचे सुपुत्र हुतात्मा विठ्ठलराव उर्फ भाई कोतवाल यांनी आपल्या क्रांतीवीरांच्या सहकार्याने कर्जत, कल्याण, मुरबाड तालुक्यात समांतर सरकार स्थापन करून जुलमी इंग्रज सरकारच्या विरोधात लढा दिला होता. अशा महान वीरांना आदरांजली अर्पण करून रक्तरंजित ऐतिहासिक लढ्याच्या जनजागृती साठी या प्रथम वर्षीच स्वातंत्र्य संग्रामात केलेल्या कामगिरीच्या गौरवार्थ त्यांच्या वारसांना नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पवन कोतवाल, मनोहर खांगटे, गिरीश पवार, कामिनी शिंदे, हेमलता चौधरी यांनी मानपत्राचा स्वीकार केला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच काही माजी लोकप्रतिनिधी, नगरपरिषदेचे कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version