। पोलादपूर । वार्ताहर ।
तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे विविध क्षेत्रातील मान्यवर गुणवंतांचा येत्या रविवारी (दि. 19) कापडे येथे आकार प्रतिष्ठान पोलादपूर या सेवाभावी संस्थेतर्फे सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर व सेलिब्रिटींची उपस्थिती राहण्यासाठी आकार प्रतिष्ठानतर्फे प्रयत्न आहेत. संस्थेच्या पदाधिकार्यांनी मार्गदर्शक व्यक्तींच्या मदतीने पोलादपूर गौरव पुरस्कार 2024-25 पुरस्कार जाहीर केले आहेत.
यामध्ये पोलादपूर तालुका आदर्श शिक्षक, शिक्षक रत्न पुरस्कार (प्राथमिक विभाग) सचिन परशुराम दरेकर (राजिप शाळा गोळेगणी), पोलादपूर तालुका आदर्श शिक्षक, शिक्षक रत्न पुरस्कार (माध्यमिक विभाग) सुनंदा दिलीप जावळे (माध्यमिक विद्यालय सवाद, पोलादपूर), पोलादपूर तालुका आदर्श शेतकरी कृषी रत्न पुरस्कार संभाजी सालेकर (वाकण), पोलादपूर तालुका आदर्श साहित्य सेवक भाषा गौरव पुरस्कार अरुणा अजित भागवत (पोलादपूर), पोलादपूर तालुका आदर्श कीर्तन सेवा प्रबोधन रत्न पुरस्कार- ह.भ.प. शिवम महाराज कदम (तुर्भे ), पोलादपूर तालुका आदर्श शाळा विशेष गुणवत्ता पुरस्कार (प्राथमिक विभाग) राजिप शाळा चरई, पोलादपूर तालुका आदर्श शाळा विशेष गुणवत्ता पुरस्कार माध्यमिक विभाग साने गुरुजी विद्यालय (लोहारे, पोलादपूर), पोलादपूर तालुका आदर्श खेळाडू क्रीडा रत्न पुरस्कार श्रुती उतेकर (रानवडी), पोलादपूर तालुका आदर्श शासकीय अधिकारी सेवा रत्न पुरस्कार अनिल पवार (ग्रामसेवक) लोहारे, पोलादपूर तालुका आदर्श व्यावसायिक उद्योग रत्न पुरस्कार अशोक पवार (कापडे फौजदारवाडी), पोलादपूर तालुका आदर्श समाजसेवक समाजरत्न पुरस्कार- शिवराम उतेकर (तुर्भे, पोलादपूर), या विविध क्षेत्रातील गुणवंत मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे असून आकार प्रतिष्ठान पोलादपूर संस्थेतर्फे अध्यक्ष अजय सलागरे व उपाध्यक्ष रामदास सकपाळ यांनी पुरस्कार जाहीर केले आहेत.