| पनवेल | वार्ताहर |
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पनवेल तालुक्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या देवदूतांचा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नावडे तळोजा उपकेंद्र येथे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता देविदास बैकर, नावडे शाखा सहाय्यक अभियंता निलेश बुकटे, प्रधान तंत्रज्ञ गोपाल बारी, गणेश पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ संदेश खुटले, चंद्रशेखर रंगारी, सचिन वरवटकर, तंत्रज्ञ भाऊसाहेब राठोड, शेख अझरूद्दीन, विद्युत सहाय्यक सुरज वैराळे, आशिष राठोड, ओमकार गायकर, पुष्पराज चौधरी, आकाश पाटील, भुषण पाटील, बाह्यस्त्रोत्र कर्मचारी हरी भोपी, म्हात्रे मामा, जितू पाटील, भरत निघुकर, संतोष पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास शांताराम कुंभारकर, हरेश पाटील, प्रमोद पाटील, सुनील पाटील, विष्णू भोईर, रवींद्र फडके, तुलशिराम मुकादम, परशुराम गायकर, शंकर देशेकर, मोहोदर एकनाथ सिनारे, दिलीप पाटील, महेंद्र पाटील, विष्णू ढोंगरे, काशिनाथ पाटील, नंदू म्हात्रे, परशुराम पाटील, वासुदेव पाटील, सुरेश पाटील, भरत पाटील आदी उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांचा सत्कार
