। आगरदांडा । प्रतिनिधी ।
अयोध्येत कारसेवक म्हणून गेलेले उमेश केशव गोबरे यांचा सत्कार बाजारपेठ तरुण मित्र मंडळातर्फे डॉ. राज कल्याणी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले.
1992 साली कारसेवक म्हणून गोबरे अयोध्येत जाऊन महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. जीवाची पर्वा न करता ते मोठ्या उत्सहात सहभागी झाले होते. त्यांच्या अमोघ कार्याची दखल बाजारपेठ व्यापारी व डॉक्टर यांनी घेत हा विशेष सत्कार करण्यात आला. सदरचा सत्कार स्वीकारताना त्यांच्या पत्नी तनुजा गोबरे व मुले सुद्धा उपस्थित होते.
यावेळी डॉ. मयूर कल्याणी, डॉ. भाविका कल्याणी, डॉ. सुनील पटेल, हसमुख जैन, सचिन शहा, कीर्ती शहा, संदीप पाटील, नितीन आंबुर्ले, नगेंद्र सिंह, राहुल कासार, राजू संघवी, सिद्धेश करंबे आदी मान्यवर उपस्थित होते.