विजय मेथा यांचा सन्मान

। माणगाव । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील प्रसिद्ध उद्योजक व शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्था माणगावचे सल्लागार तथा गोरगरीब जनतेला दृष्टी मिळवून देण्यात आनंद मानणारे खेमचंद (विजयशेठ) मेथा यांचा शंकरा आय हॉस्पिटल न्यू पनवेलतर्फे 29 जून रोजी यथोचित सन्मान करण्यात आला.

मेथा हे गेली दोन वर्षांपासून माणगाव शहरात शंकरा आय हॉस्पिटल न्यू पनवेल यांच्या सहकार्याने आपल्या विजयशेठ चॅरिटेबल ट्रस्ट माणगावतर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करीत आहेत. खाजगी रुग्णालयांतून होणारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया याचा खर्च गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला न परवडणारा आहे. याचा विचार करीत विजयशेठ मेथा यांनी गरीब जनतेची सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा मानून गरिबांना आपल्या सामाजिक कार्यामुळे मिळणारी दृष्टी याचा निखळ आनंद मानून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करीत आहेत. मेथा यांच्या या समाजसेवी कार्याचा गौरव म्हणून त्यांना शंकरा आय हॉस्पिटल न्यू पनवेलतर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ.राजेश कापसे, डॉ.प्रकाश पाटील, डॉ.गिरीश बुधराणी, डॉ. आर.रामाणी, डॉ. राधा रामाणी आदी मान्यवरांसह विधिता मेथा, स्नेहल मेथा तसेच जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थीत होते.

Exit mobile version