विजया कुडव यांचा सत्कार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या माजी सदस्या, रायगड भूषण ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री विजया कुडव यांचा शुक्रवारी (दि.23) ‘जन्मठेप’ नाटकाच्या कलाकारांच्या वतीने साहित्यिक उमाजी केळुसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ग्रामीण रंगभूमी जिवंत ठेवण्याचा ध्यास घेतलेल्या आणि त्यासाठी आयुष्य वाहिलेल्या नाट्य अभिनेत्री विजया कुडव यांची निर्मिती, दिग्दर्शीय परिसस्पर्श लाभलेल्या, नाटककार कमलाकर बोरकर लिखित ‘जन्मठेप’ नाटकाचा नुकताच कातळपाडा येथे हजारो नाट्यरसिकांच्या उपस्थितीत प्रयोग झाला. या नाटकासाठी रायगड जिल्ह्यातील गुणी कलाकारांची त्यांनी निवड केली होती. तसेच, उच्च कलानिर्मिती साधण्यासाठी उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट रंगभूषा याची साथ त्यांनी घेतली होती. हा नाट्यप्रयोग यशस्वी केल्याबद्दल या नाटकाच्या कलाकारांच्या वतीने कोकण भूषण प्रकाश नागू म्हात्रे यांनी त्यांचा सत्कार आयोजित केला होता.

कार्यक्रमाला साहित्यिक उमाजी केळुसकर तसेच, प्रकाश म्हात्रे, सुनील बुरुमकर, नंदकुमार पाटील, अजित नरवेकर, अनिल पाटील, सुधीर पाटील, अनिल पाटील कणेकर, सुरेश पाटील, शैलेश कनगुटकर, अनिल चिंचकर, यतीन राऊत, महेश चिंचकर, सपना राऊत, अस्मिता चिंचकर, मधुश्री नेवगी, भक्ती चिंचकर उपस्थित होते.

Exit mobile version