| कल्याण | प्रतिनिधी |
नवरात्रीच्या निमित्ताने कल्याण परिमंडळात सन्मान सौदामिनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी वीजपुरवठासारख्या जोखमीच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महावितरणमधील महिला अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी यांचा मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.
यावेळी बोलताना मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी महावितरण प्रशासनामध्ये कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांची दखल घेऊन अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले. तसेच, आज सगळ्याच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला कार्यरत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित कौमुदी परदेशी- कार्यकारी अभियंता, स्मिता काळे आणि सावनी मालंदकर- उपकार्यकारी अभियंता, शर्वरी पाटील- सहाय्यक अभियंता, स्मिता साळुंखे आणि पौर्णिमा उदावंत- वरिष्ठ व्यवस्थापक (मासं), मयुरी बोरसे- उपव्यवस्थापक (विवले), सिद्धी देसाई, नीलिमा रणदिवे, तृष्णा सोनवणे, ज्योती जाधव, दर्शना कारेकर- बाह्य स्त्रोत कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अधिक्षक अभियंता- विजय फुंदे, अनिल थोरात, सुशिल पावसकर- सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन), रामगोपाल अहिर- उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पेवेकर यांनी केले.







