कर्तबगार महिलांचा सन्मान


| शिहू | वार्ताहर |

सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या उत्कर्षासाठी निस्वार्थ भावनेने कार्यरत व प्रसिद्धीच्या मोहापासून अलिप्त अशा महिलांच्या कार्याचा गौरव जागतिक महिला दिनाच्या पार्शभूमीवर नागोठणे पोलीस स्टेशनच्यावतीने आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी महिला पोलीस पाटील, महिला दक्षता समिती, विभागातील महिला सरपंच, उपसरपंच, महिला वायरमन, महिला उद्योजिकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच सुप्रिया महाडिक, नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पी आय. संजय चव्हाण, सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक, प्रमोद कदम, ब्रम्हकुमारी पूनम दीदी, वरदा कुलकर्णी, श्रेया कुंटे यांसह महिला पोलीस कर्मचारी व विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणार्‍या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवलदार मनीषा लांगी यांनी, तर आभार प्रदर्शन पोलीस हवालदार विनोद भोईर यांनी केले.

Exit mobile version