| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट आणि सिल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात आला.
श्री साई ट्रस्टचे नेरळ येथील कार्यालय असलेल्या वाल्मीक नगरमधील महिला विकास केंद्र येथील सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंगेश म्हसकर, अंकुश दाभणे, नम्रता कांदळगावकर, श्रद्धा कराळे यांची उपस्थिती होती. यावेळी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान श्री साई ट्रस्टचे अध्यक्ष गणेश अय्यर, संचालिका लक्ष्मी अय्यर, परमेश्वरी आणि गाला यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महिलांमध्ये वारकरी कल्पना हिलाल, सामाजिक कार्यकर्ता रिद्धी गाला, आरोग्यसेविका हेमलता बोरसे, कायदेशीर सल्लागार अॅड रंजना धुळे, पोलीस शिपाई अनघा पाटील, शिक्षिका तेजस्विनी सदावर्ते आणि ज्योती जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
