| नवीन पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे सर्वसामान्य महिलांसाठी सेवा करणार्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वरसंस्कार संगीत विद्यालयाच्या संचालिका अॅड. सुरेखा भुजबळ यांच्या हस्ते आणि के.आ. बांठीया विद्यालयाचे प्रा. भगवान माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे सल्लागार प्रमोद वालेकर, अध्यक्ष रत्नाकर पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पनवेल पत्रकार महासंघाचे अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी सर्वसामान्य महिलांसाठी अविरत सेवा करणार्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करून दिशा महिला मंचच्या अध्यक्षा नीलम आंधळे, सावित्रीबाई फुले महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा नाझनिन पालेकर आणि भारत विकास परिषदे मार्फत अनेक उपक्रम राबविणार्या ज्योती कानिटकर यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा पनवेल तालुका महासंघातर्फे सन्मान करण्यात आला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सनिप कलोते आणि दिपाली पारसकर यांनी, तर उपस्थितांचे आभार प्रमोद वालेकर यांनी व्यक्त केले.