| माणगाव | प्रतिनधी |
माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवार (दि. 8) मार्च शासकीय विश्रामगृह माणगाव याठिकाणी नगरीचे नगराध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्याहस्ते नारीशक्तीचा आकर्षक सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माणगाव नगर पंचायतीच्या स्वछता समिती सभापती शर्मिला सुर्वे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण सोनाली तेटगुरे, परिचारिका शिवकांती गवळी, डॉ. केतकी क्षीरसागर, संस्था सदस्या शर्मिला सत्वे, ममता थोरे ( नगरसेविका ), यशोधरा गोडबोले, स्वप्ना साळुंके, विनया जाधव, विनया ढेपे, अपूर्वा जंगम, कल्पना पाखुर्डे, दीप्ती मोरे इत्यादी नारीशक्ती महिलांचा सन्मान करण्यात आला.
तसेच यावेळी नगरीचे नगराध्यक्ष तथा संस्थेचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पवार याना अविष्कार फाउंडेशन इंडिया ( कोल्हापूर) या संघटनेतर्फे राज्यस्तरीय संत गाडगेबाबा समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कारमूर्ती महिलांनी त्यांचे व संस्था अध्यक्ष सलीम शेख यांनी सर्व सहकार्यांना सोबत घेऊन विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याने त्यांचेही अभिनंदन केले. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी या कार्यक्रमाचे विशेष कौतुक करून महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती उपनिरीक्षक अस्मिता पाटील, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण सोनाली तेटगुरे, शिक्षिका अपूर्वा जंगम, शिक्षिका विनया जाधव , ममता थोरे ( नगरसेविका ) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेने सन्मानित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
प्रास्ताविकात बोलताना संस्था अध्यक्ष सलीम शेख यांनी सर्व सत्कारमूर्ती महिलांची त्यांनी आपापल्या क्षेत्रात काम करताना केलेल्या कार्याची माहिती देऊन महिलाना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास नगरीचे उपनगराध्यक्ष राजेश मेहता, नगरसेवक कपिल गायकवाड, संस्थेचे कायदेशीर सल्लागार भालचंद्र खाडे, सचिव शंकर शिंदे गुरुजी, खजिनदार अरुण क्षीरसागर, जेष्ठ पत्रकार मजिद हाजिते, आजेश नाडकर, सचिन देसाई, विवा कॉलेज माणगाव प्राचार्य विवेक ढेपे ,सहसचिव उमेश यादव, प्रा. हर्षल जोशी, प्रसाद धारिया, सचिन पेंडसे, शेखर घाग, अजित शेडगे, अमोल पवार, नितीन शेलार, संदीप म्हामुणकर, राजू सुतार, ग्रामसेवक राजेंद्र तेटगुरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक मोरे, संजय गवळी, काजल डान्स अकॅडमीच्या संस्थापिका काजल पाखुर्डे, रश्मी तेटगुरे, नंदिनी जाधव आदी उपस्थित होते.







