एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन कामगार ठार

दोन वाहनांचे नुकसान
खोपोली | वार्ताहर |
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर रविवारी मध्यरात्री वर्‍हाडाच्या बसने मार्गावर काम करणार्‍या टँकरला धडक दिल्याने तेथे काम करणारे तीन कर्मचारी जागीच ठार झाले. सध्या बोरघाटात या महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहेत त्यामुळे काम करणार्‍या यंत्रणेसह वाहने व कामगार कार्यरत आहेत. 11 डिसेंबर रोजी लोणावळ्याहून रात्रीच्या वेळेस मुंबई कडे वर्‍हाडी प्रवासी घेऊन एक बस जात होती.त्या बसने काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंटचा बलकर टँकर ला जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती की त्यात काम करणारे तीन कामगार जागीच ठार झाले. नितेश दशरथ कांबळे रा खोपोली शांतीनगर ,बबलू, जगदीश राज अशी ठार झालेल्या कामगारांची नावे आहेत.
बस मधील प्रवासीही किरकोळ जखमी झाले. अपघातात आणखी दोन वाहनांना धडक बसल्याने एकूण चार वाहनांचे नुकसान झाले आहे
घटनास्थळी ठिकाणी आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची रुग्णवाहिका व्यवस्था, बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, प्सकॉन कंपनीचे कर्मचारी, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य तसेच मृत्युंजय देवदूत या ठिकाणी मदत करत होते

Exit mobile version