| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिट जवळ कारला ट्रकने मागून ठोकर दिल्याने अपघात झाला. या अपघातात कारचे पूर्णपणे नुकसान झाले असून चौघे जखमी झाले आहेत.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिट जवळ सदर कार आली असता मागून येणाऱ्या ट्रकने तिला डाव्या बाजूला धडक दिली. कार त्या धक्क्याने पुढील टेम्पोवर धडकली. कारचे संपूर्ण नुकसान झाले असून सुदैवाने त्यातून प्रवास करणारे प्रवासी बचावले. प्रवाशांपैकी दोन पुरुष, दोन महिला, एक लहान मुलगी व तीन लहान मुले होती.

एक महिला, एक पुरुष, एक लहान मुलगा आणि एक मुलगी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पलंगे आणि लांडे रा. दौड- पुणे दोन कुटुंबातील हे सदस्य आहेत. सचिन पलंगे ४२ वर्ष, सिद्धी सचिन पलंगे १० वर्षे, प्रियंका अमोल लांडे ३२ वर्ष, श्लोक सचीन पलंगे ५ वर्षे अशी जखमींची नावे आहेत.
कार ही पुण्याहून कल्याणकडे निघाली होती. सदर अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला आहे.