माथेरानमध्ये घोड्याचे आरोग्य शिबीर

पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या पर्यटनस्थळी प्रवासी वाहतूक करणार्‍या घोड्यांना पशुसंवर्धन विभागाचा मदतीचा हात मिळाला असून सोमवारी (दि.29) येथील श्रेणी 1 च्या पशुवैद्यकीय इस्पितळात येथील नव्यानेच रुजू झालेल्या पशुधन अधिकार्‍यांकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या मार्च पासून येथे पशुधन विकास अधिकारी नव्हता. आता नव्यानेच रुजू झालेल्या अधिकार्‍यामुळे येथील घोड्यांना तसेच पशुधनाला नवसंजीवनी मिळाली आहे.
माथेरानमध्ये मोटरवाहन नसल्यामुळे येथील प्रमुख वाहन म्हणजे घोडा. या घोड्यावर रपेट मारण्यासाठी पर्यटक माथेरानला येतात. प्रवासी वाहन घोड्यांची संख्या 460 इतकी असून मालवाहू घोडे 300 पेक्षा अधिक आहेत. त्यामुळे येथे नव्याने रुजू झालेले पशुसंवर्धन अधिकारी अमोल कांबळे यांनी घोड्यांचे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास येथील अश्‍वचालकांनी भरभरून प्रतिसाद देत हे शिबीर यशस्वी केले. यामध्ये सरा रोगाची तापसणी करण्यात आली. यावेळी टिटी इंजेक्शन देण्यात आले. या शिबिरात पशुधन अधिकारी सागर कसबे, परिचारक राम तिटकारे, स्वप्नील राजपूत यांनी सहकार्य केले.

Exit mobile version