माथेरानमध्ये अश्व शर्यतींचा जल्लोष
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान नगरपरिषद आणि माथेरान युथ सोशल क्लब यांच्या माध्यमातून अश्व शर्यतींचे आयोजन केले जाते. दोन दिवसीय माथेरान वार्षिक क्रीडा स्पर्धेत पर्यटक आणि स्थानिकांनी मोठा सहभाग घेतला. माथेरान युथ सोशल क्लब कडून गेली 55 वर्षे माथेरान वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते.
माथेरान सोशल क्लबचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष प्रदीप दिवाडकर यांनी माथेरानमध्ये अश्व शर्यती सुरू केल्या. त्यानंतर माथेरान नगरपरिषद आणि माथेरान सोशल यांच्याकडून माथेरान वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन येथील ऑलिंपिया रेसकोर्स हुतात्मा भाई कोतवाल मैदान येथे करण्यात येऊ लागले. वेळी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी उपनगराध्यक्ष संतोष शेलार दिव्यांग कल्याण सभापती रिजवाना अनिस शेख बांधकाम सभापती गौरंग वाघेला, नगरसेवक सोहेल महापुळे, किरण पेमारे उपस्थित होते. माथेरान सोशल क्लबचे अध्यक्ष प्रशाम दिवाडकर तसेच करण संघवी, प्रसाद सावंत, छाया दवे, शर्मिला दिवाडकर, रितिका दिवाडकर यांच्यासह माथेरानमधील आश्वपाल या स्पर्धेचे नियोजनात आघाडीवर असतात. दोन दिवसीय पंच म्हणुन प्रशांत दिवडकर तसेच दिनेश आखाडे आणि जाणू आखाडे यांनी काम पाहिले.1989-90 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने सन्मानित झालेल्या कल्पना दिवाडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
विविध स्पर्धांमधून लोकल चॅम्पियन सबील महापुळे हे ठरले. तर टुरिस्ट चॅम्पियन सुफियान शेख यांचा सन्मान झाला. सहा स्पर्धांमध्ये सुफियान शेख यास प्रथम पारितोषिक मिळाले घोड्याचे नाव बाबर होते. चॅम्पियन हॉर्स म्हणून बाबर या घोड्याचा प्रथम क्रमांक आला.मनन सोनी, शैलेश शिंदे, जानू आखाडे, अब्बास मुकादम, अभिषेक मूर्ती, आयान मूर्ती, गोविंद झोरे, हितेश शहा, हर्षल दवे, आनंद विरामने, आतिक अल्ताफ, रईस कुरेशी, मुजफ्फर पटेल यांनी विविध गटात पारितोषिके मिळविली. यावेळी माथेरान मधील डोंगर भागात राहणार आदिवासी यांच्यासाठी धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली.
