एसटी कर्मचार्‍यांसाठी रुग्णालय

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील अनेक बसस्थानके बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर विकसित करण्यात येत आहेत. या एस.टी.च्या प्रकल्पात प्रत्येक जिल्ह्यात 25 तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर 100 खाटांचे रूग्णालय एस.टी. कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात येणार आहे. या रूग्णालयात एस.टी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतील, तसेच पाच लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्य शासन करेल, अशी घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमनात आणण्यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव, संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

Exit mobile version