निजामपूरात घरफोडी;दागिने लंपास

| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे घरफोडी करुन चोरट्याने 65 हजार रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केला. ही घटना शनिवार ते रविवार दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद मारुती नामदेव काकरे (वय-55, मूळ रा. माळहिपरगा जि. लातूर, सध्या रा. सोमजाई अपार्टमेंट निजामपूर ता. माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

माणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, मारुती काकरे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे टाळे तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. बेडरूममधील शोकेसच्या वरच्या कप्प्यात ठेवलेल्या पर्समधून एक सोन्याची चैन (वजन 10 ग्रॅम) जुनी वापरती अंदाजित किंमत 60 हजार रुपये, एक सोन्याची नथ वजन 1 ग्रॅम जुनी वापरती अंदाजित किंमत 5 हजार रुपये, असे एकूण 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

Exit mobile version