विजेच्या तारा एकमेकांना घासल्याने घराला आग

। महाड । प्रतिनिधी ।

किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेले महाड तालुक्यातील पाने गावातील पर्बत सुतार यांच्या घरावरून विद्युत तारा गेलेल्या असल्याने त्या अचानक एकमेकांना घासून शॉर्ट सर्किट झाल्याने अचानक आग लागली. रात्रीच्या सुमारास अंधार असल्याने पाने गावातील ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. महाड एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने पूर्ण घर आगीमध्ये भक्ष्यस्थानी पडले. ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. महाड एमआयडीसी अग्निशमन काही तासांनी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत घर उपयुक्त वस्तूसह सगळे कपड्यासहीत पैसे, सामान आगीत भस्मसात झाले. घरामध्ये पर्बत सुतार यांच्या पत्नी व आई असे मिळून तिघेजण घरात होते. आपल्या घराला अचानक आग लागली असे समजताच घरातील सगळे जण घाबरून बाहेर पडल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही. पण घर आगीने भस्मसात केले. तरी शासनाने तातडीने पंचनामे करून त्यांना आवश्यक ती मदत करावी अशी सर्व पाने गावातील ग्रामस्थ यांनी मागणी केली आहे.

Exit mobile version