अडणाले येथे घराला आग

। तळा । वार्ताहर ।

तळा तालुक्यातील अडणाले येथे घराला आग लागण्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अडणाले येथील सखाराम आंबेकर यांच्या घरी रात्री बारा वाजताच्या दरम्यान शॉक सर्किटमुळे आग लागली. सुदैवाने सखाराम आंबेकर हे सोलमवाडी येथे राहायला गेले असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच महावितरण विभाग व पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, गावकर्‍यांनी आपल्या परीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. प्रचंड प्रमाणात आग लागल्याने ती विझविणे ग्रामस्थांनी शक्य झाले नाही. अग्निशमन गाडीच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, मोठ्या प्रमाणावर आग लागल्याने घरातील सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले आहे.

Exit mobile version