बोर्ली येथे घराला लागली आग; पंचवीस हजारांचे नुकसान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

मुरूड तालुक्यातील बोर्ली येथे उमेश गजानन कारेकर यांच्या घराला आग लागून आगीत रुपये पंचवीस हजारांचे नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद रेवदंडा पोलीस ठाण्यात उमेश कारेकर यांनी दिली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुरूड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील मौजे बोर्ली येथे (दि.26) रोजी दुपारी दोनच्या सुमारास उमेश कारेकर यांच्या बंद घराला अचानक आग लागली, या आगीत पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून, अधिक तपास रेवदंडापोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक अनुष्का पुळेकर करीत आहेत.

Exit mobile version