भिसेगाव टेकडीवरील गृहप्रकल्प धोकादायक

स्लॅब कोसळल्याने बांधकामावर प्रश्‍नचिन्ह
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील एसटी आगाराच्या मागे असलेल्या टेकडीवर मोठा गृहप्रकल्प उभा राहिला आहे. टेकडीवर कोणत्याही सुरक्षा बाबींची पूर्तता न करता उभा राहिलेलया या गृहप्रकल्पामुळे भिसेगाव ग्रामस्थ आणि एसटी आगार परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचा काही भाग कोसळल्याने तेथील बांधकामावर मोठे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, तेथे कामगाराचा त्या अपघातात मृत्यू झाल्याने स्थानिक नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी संपूर्ण गृहप्रकल्पाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव येथे मुंबईचे विकासक अरिहंत अलोकी या कंपनीचे ग्रामप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या कंपनीच्या विकासकाकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचे यापूर्वी अनेकवेळा सिद्ध झाले आहे. अनेक वेळा येथील बांधकाम पडल्याने सदरचे काम भविष्यात हा गृहप्रकल्प धोकादायक ठरणार आहे. बिल्डर कडून स्टेट कामात देखील हलगर्जीपणा केला जात असल्याने जीवितहानी होण्याची घटना घडली आहे.
एक महिन्यांपूर्वी बिल्डिंगच्या कॉलमचे बांधकाम करताना कामगाराला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला होता. 25 ऑक्टोबर 2021 रोजी इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळून येथे काम करत असलेल्या कामगाराला गंभीर दुखापत होऊन त्यास बदलापूर येथे उपचारास दाखल करावे लागले होते. याबाबतीत वारंवार तक्रारी करून देखील पालिका प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने कर्जत नगर परिषद या बेजबाबदार विकासकांच्या दुर्घटना होणार्‍या कामाला पाठीशी घालणार्‍या प्रशासनाला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा नगरसेवक ठोंबरे यांनी दिला आहे.

Exit mobile version