विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे ? जाणून घ्या…

लग्नानंतर महिलांना अनेक कागदपत्रांमध्ये बदल करावे लागतात. त्यामध्ये आपले आधार कार्ड वरील नाव बदलण्यासाठी, बँकेमध्ये जॉईंट खाते उघडण्यासाठी किंवा जीवन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच इतर शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व इतर कामासाठी आपल्याला विवाह प्रमाणपत्राची आपल्याला गरज भासते.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:-
विवाह नोंदणी प्रमाणमत्र ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी आपले सरकारची खाली दिलेली वेबसाईट ओपन करायची आहे.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिका करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करावी लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकून लॉगिन करायचे आहे.
त्यानंतर आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या अजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला असेल. त्यामधील तुम्हाला सोयीस्कर असलेली भाषा निवडा. त्यानंतर डाव्या बाजूला शासनाच्या विविध सेवा येतील त्यातील ग्राम विकास व पंचायत राज हा पर्याय निवडा.
हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मुत्यूचा दाखला, जन्म नोंद दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील विवाह नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करून नंतर पुढे जा वर क्लिक करा.
पुढे ग्रामविकास विभागाची वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये विवाह नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

अर्जदाराची माहिती-
1) तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका व गावाचे नाव टाकायचे आहे.
2) त्यापुढील रकान्यामध्ये वराचे संपूर्ण नाव, विवाह दिनांक आणि विवाहाचे ठिकाण टाकायचये आहे.
3) पुढे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
4) तसेच वधूचे नाव व वधूचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ( वधूचे नाव टाकताना सासरचे नाव व शाळेच्या दाखल्यावर जे नाव असेल ते नाव टाकायचे आहे.)
5) यानंतर समावेश करा या पर्यायावर क्लिक करा.
पुढे तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिसेल तिथे ओके या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर खाली अपलोड डॉक्युमेंट्स हा पर्याय निवडा. तिथे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.
त्यानंतर परत अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करा व नंतर येणार्‍या मेसेज वर ओके या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमची सर्व कागदपत्रे सेव्ह होतील.
यानंतर शासनाचे चलन भरायचे आहे, त्यासाठी पेटीएम किंवा एटीएम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करू शकता.
चलन भरल्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी आपले सरकार या पेजवर लॉगिन करून मुखपृष्ठ तपासा, त्यामध्ये भरलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्याबद्दल तुम्हाला काही सांगण्यात आले आहे का? असे असल्यास तुमचा अर्ज नाकारला जाईल.
विवाह प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर तुमचं नाव, अर्ज क्रमांक तसेच प्रमाणपत्र डाउनलोड करा असे पर्याय दिसतील तिथून तुम्ही प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.
हे प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी पाच दिवसांचा आहे. हे प्रमाणपत्र ग्रामसेवक तुम्हाला देत असतो. या कागदपत्रांवरती कुठेही सही व शिक्का घेण्याची गरज नसते कारण यावर आधीच तुमच्या ग्रामसेवकांची डिजिटल सही असते.

Exit mobile version